शिरोली फाटा येथे वादावादीत हाणामारी, पोलिसांची हस्तक्षेप

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

फेसबुकवर टिपू सुलतान व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोमध्ये तपावत निर्माण करून आलेल्या पोस्टला दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या मिस्त्रीने लाईक करून अवमान केल्या प्रकरणी स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होऊन दोघांना मारहाण केल्याने ते एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे .
हि घटना आज सकाळी दहा वाजण्यासुमार शिरोली फाटा येथे घडली . वेळेवर शिरोली पोलिसांनी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण राखले , या प्रकणात राज्याच्या कॅबिनेट मंत्रीने हस्तक्षेप करत असल्याचे समोर येत आहे . रात्री उशिरापर्यंत हिंदुत्ववादी कार्यकर्ते व मुस्लिम समाजातून परस्पर विरोधी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते .

पुलाची शिरोली ता हातकणंगले येथे मंगळवारी दुचाकी दुरूस्त करणाऱ्या मिस्त्रीने त्याच्या फेसबुक अकौंटवर बाहेरून टिपू सुलतान व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोमध्ये तपावत निर्माण करून आलेल्या पोस्टला या दुचाकी मिस्त्रीने लाईक व अटॅचमेंट केल्याने आज बुधवारी सकाळी दहा वाजता स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होऊन शिरोली फाट्यावर असणाऱ्या गॅरेजमध्ये मिस्त्रीला याचा जाब विचारत मारहाण केली यावेळी मुस्लिम समाजातील एकजण पुढे येवून त्या मिस्त्रीरीस का मारताय याचा जाब विचारत असताना त्याला ही गंभीर मारहाण केल्याने त्याच्या डोक्यास जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे तर मिस्त्रीरीस मुका मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला.

 

या घटनेची माहिती शिरोली पोलिसात मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यानी आपल्या सहकार्याना घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगवून घटनेवर नियंत्रण राखत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले वेळेवर पोलिसानी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला . पण या घटनेची माहिती वाऱ्यासारखी एका राज्याचे हिंदुत्ववादी कॅबिनेट मंत्र्यानी या घटनेचा फोनवरून आढावा घेत घटनेबाबत माहिती घेतल्याचे बोलले जात आहे .दरम्यान करवीर विभागीय पोलीस अधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत

error: Content is protected !!