स्त्रीचा आदर करणे हे आपले कर्तव्य – किरण पाटील

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

स्त्री प्रत्येक कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही.आणि कुटुंबाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. स्त्रीत्व ही शक्ती, सहनशीलता, प्रेम, करूणा, काळजी, माया अशा अनेक सदगुणांचा समुच्चय असून प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अशी प्रतिपादन किरण पाटील यांनी केले.

येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आज स्त्रियाबाबत अनेक सकारात्मक बदल कमी अधिक फरकाने घडत आहेत. तरीही स्त्रियांचे प्रश्न संपलेले नाहीत याचे कारण आजही स्त्रीकडे स्त्री म्हणून आणि पुरुषाकडे पुरुष म्हणून पाहिले जाते. दोघांनी स्वतःकडे आणि परस्परांकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे आणि माणूसपणाकडे वाटचाल केली पाहिजे. गेल्या शंभर वर्षाचा विचार केला तर या संपूर्ण कालावधीत स्त्री नागरिक म्हणून सजग झालेली दिसत नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिकूल व विरुद्ध परिस्थितीला सामोरे जाऊन स्त्रिया स्वतःला सिद्ध करत आल्या आहेत.

स्त्री प्रत्येक कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही. कुटुंबाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री ही मुलगी,पत्नी,आई,मावशी,आजी अशा अनेक भूमिका जबाबदारीने पार पाडतात. आज स्त्रिया अंतराळ, वैमानिक, रेल्वे, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शासकीय सेवेत उच्च पदावर सेवा बजावीत आहेत. तर प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात. हा दिवस महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी व त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. स्त्रीत्व हे शक्ती,सहनशीलता, प्रेम,करुणा,काळजी,माया अशा अनेक सदगुणांचा समुच्चय असून प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका विनया जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रसन्न कुलकर्णी यांनी करून दिला पाहुण्यांचा सत्कार श्रीकांत निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी तर आभार शोभा बोंगाळे यांनी मानले.

या कार्यक्रमाला सदाशिव तिगणे, सच्चिदानंद जंगम, बाबासाहेब भुजूगडे, राहुल जंगम, विजय शहापुरे, सतीश माने, गजानन केरीपाळे, सुधाकर कांबळे, सुनिता कुलकर्णी, वंदना नरके, रश्मी गुळवणी, हेमलता माळी, सोमनाथ जंगम या मान्यवरासह महिला व शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

error: Content is protected !!