पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळच्या सुकन्या आणि सोलापूर शहरच्या पोलीस उपायुक्त डॉ दिपाली काळे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यावतीने सन २०२४ सालचा बालस्नेही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.पोलीस उपायुक्त डॉ दिपाली काळे यांनी सोलापूर शहरात ऑपरेशन मुस्कान राबवून बालमजूरी विरोधात ठोस कारवाई केली. त्यांनी ज्या ठिकाणी बालमजूर काम करतात त्या सहा दुकानांवर गुन्हे दाखल केले होते. तसेच बाल संरक्षण कायदा अंतर्गत विशेष मोहीम राबवून बालमजुरी रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत‌‌. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य ‌ बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने त्यांना बालस्नेही उत्कृष्ट पोलीस उपायुक्त हा पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड सुशीबेन शहा यांनी दिले आहे.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट येथे सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे गृह राज्यमंत्री योगेश कदम महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पोलीस उपयुक्त डॉ दिपाली काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांना बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!