जीवनकल्याण अर्बन मल्टीपर्पज निधी शिरोळचा वर्धापनदिन उत्साहात ठेवीस १२% व्याजदर – निळकंठ उर्फ पिंटू फल्ले

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील जीवनकल्याण अर्बन मल्टीपर्पज निधी लि. या संस्थेचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांना ‌१२% व्याजदर देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक चेअरमन निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांनी केली आहे.संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानंतर संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, व हितचिंतक यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे चेअरमन निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांच्यासह सर्व संचालक मंडळास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगु गावडे, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर, अशोकराव माने, विजय आरगे, भगवान आवळे, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, कृष्णा भाट, उल्हास पाटील, दत्तात्रय पुजारी, बाबासो पुंदे, सरदार कुरणे, दत्तात्रय खडके, सुनील फल्ले, निलेश पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ शुभांगी फल्ले, संचालक नंदकिशोर फल्ले, भीमराव पुजारी, नवनाथ चिकोडे, शुभम धामणे, सौ. निशा चिकोडे, महेश हुपरीकर, शशिकांत चव्हाण, गजानन गावडे, विनायक फल्ले, मनोजकुमार रणदिवे, विशाल कोरे, सागर चावरे, अक्षय कोळी यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!