लाईन स्टाफच्या प्रलंबित मागण्यासाठी उतरणार रस्तावर

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये महत्वाची कामगिरी बजावणारा घटक म्हणजे लाईन स्टाफ आणि हाच लाईन स्टाफ महावितरण कंपनीचा कणा समजला जातो पण याच लाईन स्टाफ च्या प्रलंबित मागण्या साठी या लाईन स्टाफ ला रस्त्यावर उतरावे

लागत आहे. विजबिल वसुली करणे हि एक सांघिक बाब आहे आणी हि बाब लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाने एक वर्षा पूर्वी सांघिक पद्धतीने वसुली केली पाहिजे असे परिपत्रक काढले पण त्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत मनमानी कारभार चालू झाला आहे तसेच एकी कडे ट्रेनिंग सेंटर मध्ये सुरक्षित साधनांचा वापर करून लाईन चे काम करा असे शिकवले जाते व तशा पद्धतीचे सुरक्षित साधनांचे वाटप करा असे देखील परिपत्रक काढले आहे ते देखील धुळ खात पडले आहे.कामाचे तास निश्चित नाहीत, पेट्रोल अलाउन्स वाढवून मिळावे, दोन वर्षे पूर्ण झाली तरी लाईन स्टाफ ला खाकी कापड मिळाले नाही या विविध मागण्यांसाठी व लाईन स्टाफ वर अन्याय करणे,भिती दाखवून काम करून घेणे याच साठी दिनांक 10/02/25 पासून लाईन स्टाफ बंधू भगिनी यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे.याचीच प्रचिती व आंदोलनाचा पहिला भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालय च्या गेट वर द्वार सभेचे आयोजन केले होते व या द्वार सभेला कोल्हापूर परिमंडळ मधून चांगला प्रतिसाद मिळाला.एकीकडे लाईन स्टाफ ला महावितरण कंपनीचा कणा म्हणतात व दुसरीकडे त्याच कण्यावर कणा मोडू पर्यंत कामाचा बोजा टाकतात. या अन्यायाविरुद्ध सांविधानिक रित्या संघर्ष करणे हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून हे क्रम बद्ध आंदोलन लाईन स्टाफ असोसिएशन च्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन केले आहे.याच आंदोलनाचा दुसरा टप्पा दिनांक 18/02/25 रोजी प्रत्येक मंडल कार्यालयाच्या गेट जवळ द्वार सभा व थाळी नाद करणे व काळया फिती लावून निषेध व्यक्त करणे अशा पद्धतीने आयोजन केले आहे तसेच तिसरा टप्पा दिनांक 24/02/25 रोजी प्रत्येक परिमंडळ कार्यालय च्या गेट वर प्रचंड प्रमाणात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा लाईन स्टाफ असोसिएशन च्या वतीनं घेतला आहे.दिनांक 10/02/25 रोजी जयसिंगपूर विभागीय कार्यालय च्या गेट वर प्रचंड प्रमाणात द्वार सभा आयोजित केली होती या प्रसंगी कोल्हापूर परिमंडळ चे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे, कोल्हापूर मंडळ संघटक विजयकुमार गायकवाड, जयसिंगपूर विभाग सचिव तुकाराम बनबरे, उपाध्यक्ष राकेश माने, सहसचिव तौफिक मुश्रीफ,संघटक नवनाथ देवकर, कार्याध्यक्ष आबु झांबरे महीला प्रतिनिधी श्रीमती स्वाती कांबळे तसेच जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, हातकणंगले व वडगाव उपविभागातील सर्व लाईन स्टाफ उपस्थित होते.या वेळी परिमंडळ अध्यक्ष उमेश आवळे, तुकाराम बनबरे, विजयकुमार गायकवाड यांनी आपली मनोगतातुन मार्गदर्शन केले.आभार राकेश माने यांनी मानले.

error: Content is protected !!