शिरोळ / प्रतिनिधी
खाजगी शाळांमध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्यापेक्षाही जादा उच्च दर्जाच्या सुविधा जिल्हा परिषदेतील शाळेला देऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.येत्या काही दिवसांमध्ये पीएम श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर क्रमांक तीन या शाळेचा समावेश करून ती एक आदर्शवंत शाळा बनवू अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ येथे दिली.
शिरोळ येथील पीएमसी छत्रपती शिवाजी विद्यामंदिर क्रमांक तीन या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हातकणंगले मतदारसंघातील आमदार डॉ अशोकराव माने उपस्थित होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे शुभारंभ झाला.जिल्हा परिषद शाळा सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सतत आमचा प्रयत्न असतो.पण येथील शाळाचे निर्लेकर्णाचा विषय आणि अर्धवट राहिलेले कंपाऊंड मी माझ्या वतीने पूर्ण करून देईन असे आश्वासन दिले. अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना डॉ. अशोकराव माने यांनी शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी सतत लोकप्रतिनिधी आग्रही असतात.यातून सर्व परि सहकार्य राहील असे सांगितले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामात यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका सौ. शशिकला पाटील यांनी केले.मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी गायकवाड यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.तसेच आभार सौ शशिकला पाटील यांनी मानले.प्रसंगी शिरोळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव,पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,शिरोळ तालुका बाजार समितीचे मा.सभापती विजय देशमुख,मा उपसरपंच पृथ्वीराजसिंह यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी भोसले,सुरज कांबळे,जनार्दन कांबळे,सौ.हेमलता जाधव, नगरसेवक राजेंद्र माने,गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत,केंद्रप्रमुख अण्णा मुंडे,शालेय व्यवस्थापन शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्वाती कोळी,सदस्य शैलेजा कोरोचीकर,उदय माळी, संतोष सप्तसागर,दीपक शिंदे,माजी सदस्य नंदकुमार गजरे,सौ.सुरेखा येळगुडे,सौ सविता जाधव,जयश्री पेटकर,यशवंत कांबळे,राजू कादरभाई उपस्थित होते.