फळांचा राजा हापूस आंबा नाना तोडकर यांच्या ‘ओमफ्रुट’मध्ये दाखल

Spread the love

जयसिंगपूर / हुसेन शेख

 

चालू वर्षीचा फळांचा राजा हापूस आंबा सांगली येथील स्वर्गीय विष्णू अण्णा फळ मार्केट यार्ड मध्ये दाखल झालाय.पहिल्याच खेपीत झालेल्या आंब्याच्या सौद्यामध्ये 1 डझन हापूस आंब्याचा दर साडेपाच हजार पासून ते साडेसात हजार रुपये इतका झालाय.हापूस व पायरी आंबा घेण्यासाठी ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांच्या

ओमप्रूट अँड कमिशन एजंट या सौद्यात झालेल्या हापूस आंब्याचा दर साडेसात हजार रुपये इतका झाला. फटाक्याची अतिषबाजी करून हापूस आंब्याचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर हापूस आंब्यांच्या छोट्या पेट्यांना हार घालून श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आले.सांगली, जयसिंगपूर,कवठेमहाकाळ, जत,आष्टा ,इस्लामपूर व कर्नाटक सीमा भागातील चिकोडी, रायबाग तसेच बेळगाव , हुक्केरी, रबकावी बनहट्टी या भागातील मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या महिन्याचे पर्यंत फळ विक्रेते सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांच्या ओम फ्रूट अँड कमिशन एजंट यासह गुरुकृपा फ्रुट एजन्सीमध्ये हापुस, पायरी, नीलम आंबा, नागीण आंबा, खोबरा आंबा, तसेच राजापुरी व तोतापुरी आंबा शेंदऱ्या आंबा, केशर वनराज ,सिंधू आंबा अशा विविध जातीचे आंबे दाखल होणार असून ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आंबा खरेदीसाठी यावे असे आवाहन सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!