प्रतिनिधी शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
सोमवारी रात्री अंबप कासारवाडी दरम्यान मोटरसायकलवरून प्रवास करताना नागाव येथील महिलेचा उपचारादर्म्यान मृत्यू झाला.मयत महिलेचे नाव संगीता कृष्णात माळी वय ३९ रा नागाव ता हातकणंगले असे असून हा अपघात सोमवारी रात्री १०:३० वाजण्यासुमार घडला.अधिक माहीती अशी कि अंबप गावची यात्रा सुरू असल्याने संगीता माळी या पती व मुलगा यांच्यासोबत पाहूण्यांकडे सोमवारी रात्री जेवणासाठी गेल्या होत्या जवण करून त्या नागाव गावाकडे परत येत असताना अंबप कासारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर त्या अचानक गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास झोराचा मार लागल्याने त्या कोमात गेल्या त्यांच्या कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी ८ वाजण्यासुमार मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पती एक मुलगा ,मुलगी असा परिवार आहे .