पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
फडकर्यानी ऊस तोडण्यासाठी फड पेटवल्याने नवजात बिबट्या दृश्य बछड्याचा होरपळून मृत्यू झाला तर एका घोनस सापाचे ही डोळे गेले ही घटना नागाव येथील हिंगणे मळ्यात घडली . घटनास्थळी वनविभागाचे अधिकार्यानी भेट देवून घटनेची पाहणी करत बछड्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले . ऊसाला आग लागताच बिबट्याने फडातून पळ काढल्याचे फडकर्याच्या एका लहान मुलाने पाहीले .वनरक्षकांकडून परिसरात पाहणी
नागाव ता हातकणंगले येथील हिंगणे मळातील चिंतामणी सोळांकुरे यांच्या ऊसाच्या फडाला मंगळवारी तोड आल्याने फडकर्यानी उभा ऊस चौहू बाजूनी पेटवून दिल्याने यात पिलासह लपलेले बिबट्या दृश्य मादीने जाळाची धग लागताच पलायन केले असल्याचे फडकर्याच्या लहान मुलाने पाहीले असल्याचे त्याने वनविभागाच्या अधिकार्याना सांगितले पण त्याने केलेल्या वर्णनावर अधिकार्यानी अविश्वास दाखवत ज्या दिशेने बिबट्याने पलायन केले त्या परिसरात बिबट्या दृश्य प्राण्याची काही पाहूल खुना सापडतात का ते पाहीले पण त्याना काही सापडे नाही त्यामुळे आज रात्री ड्रोन काॅमेरा द्वारे त्यांचा तपास करण्यात येणार असल्याचे अधिकार्यानी सांगितले .
ऊसाच्या फडात होरपळून मृत्यू झालेल्या ७ ते ८ दिवसाच्या बिबट्या दृश्य बछड्याचा जन्म झाला असल्याचे अधिकार्यानी सांगितले त्यामुळे या परिसरात अन्य बछडे व त्यांची आई सुरक्षित किंवा याच फडात त्यांचाही होरपळून मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण शेतातील ऊस अजून तोडून पुर्ण झालेल्या नसल्याने हा अंदाज लावण्यात येत आहे . या आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला त्याच बरोबर एका घोणस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमवावे लागले .
यावेळी वनअधिकारी एम एस पोवार, अमोल चव्हाण , टोप वैद्यकीय अधिकारी आश्विनी बोंगार्डे यासह नागरिक उपस्थित होते.