टाकवडे येथे ‘आनंदी स्वीट्स अँड नमकीन’ कंपनीला भीषण आग

Spread the love

टाकवडे / प्रतिनिधी

टाकवडे येथील रवींद्र विनायक पोळ यांच्या ‘आनंदी स्वीट्स अँड नमकीन’ कंपनीला आज, सोमवार, 27 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.आगीची माहिती मिळताच इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.या आगीत कंपनीतील मनकीन, कुरकुरे, स्वीट साहित्य,मशिनरी, गॅस टाक्या आणि इमारत संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत कंपनीला सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे आणि श्री पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.तसेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून एकूण नुकसान कळणार आहे.रात्रीची वेळ असल्यामुळे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र,कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने मालक व कर्मचारी, ग्रामस्थातुन हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!