टोप नगर भूमापन कार्यालयात परीक्षण भूमापकची तात्काळ नियुक्ती करा युवा सेनेची खा धैर्यशील माने यांच्याकडे मागणी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

हातकणंगले उप अधीक्षक भूमी अभिलेख अंतर्गत टोप भूमि अभिलेख कार्यालयात परीक्षण भूमापक याची तात्काळ नेमणूक करावी या मागणीचे निवेदन हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना कोल्हापूर जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख विनायक विजय यादव यांनी दिले.टोप येथील भूमी अभिलेख कार्यालयात परीक्षण भूमापक हे पद गेल्या काही दिवसापासून रिक्त आहे. त्यामुळे हातकणंगले भूमी अभिलेख येथील अधिकारी आठवड्यातून एकदा टोप येथे येतात. या भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत शिरोली सह अकरा गावांचा समावेश आहे. नोंदणीकृत खरेदी पत्र ,वाटणी पत्र,बँक बोजा नोंद ,वारस नोंद, न्यायालयीन कामकाज होण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या लोकांच्या अडचणीचा विचार करता या ठिकाणी कायमस्वरूपी परीक्षण भूमापक असणे आवश्यक आहे . तरी या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांचेकडे करण्यात आली .यावेळी किरण मिठारी (नागाव) प्रथमेश यादव, शाहरुख देसाई ,अनिल पुजारी ,यशवंत खोत ,पिंटू कांबळे ,सहदेव शिंदे उपस्थित होते. खासदार माने यांनी त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही शिष्ट मंडळाला दिली.

error: Content is protected !!