मौजे वडगाव कामधेनू सहकारी दूध संस्थेत ३८ लाखाचा अपहार ९ संचालकांना २ दिवसाची पोलिस कोठडी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

मौजे वडगाव येथील कामधेनू सहकारी दूध व्यावसायिक संस्थेमध्ये ३८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जुन्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता त्याना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.मात्र संस्थेचे सचिव व लेखापरीक्षक गेली तिन दिवसापासून फरार झाले आहेत.

 

 

मौजे वडगाव ता हातकणंगले येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या निवडणूकीत सत्तांतर झाल्याने सत्ताधारी संचालकानी संस्थेच्या कारभारा विषयी सर्व रेकॉर्ड तपासत असताना त्याना १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ३८ लाखाचा अपहार माजी संचालकानी केला असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यानी माजी संचालकांवर शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता आज सोमवारी शिरोली पोलिसांनी माजी संचालकाना ताब्यात घेवून त्याना कोर्टात हजर केले असताना त्याना २२ तारखेपर्यंत म्हणजे दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली यामध्ये १३ जणांचे संचालक मंडळ असून यातील उमा चौगले,बशीर हजारी, गुंडा कांबरे,संजय सावंत,सुभाष चौगले,हसन बारगीर, विजय मगदूम, पूजा चौगले,किरण चौगले या ९ संचालकांना कोर्टात हजर झाले तर महमंद हाजारी, संजय सिताराम चौगुले,सुशीला गोरड,कमल हजारी या चार संचालकांची तब्येत बरी नसल्याने त्याना कोर्टासमोर हजर करता आले नाही त्यांची मंगळवारी मेडिकल तपासणी करून त्याना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसानी सांगितले तर सचिव रमेश लोंढे व महादेव परीट लेखापरीक्षक फरार असून त्यांचा ही शोध पोलिस घेत असल्याचे शिरोली पोलीसांनी सांगितले .

error: Content is protected !!