अजमेर गरीब नवाज उरूस निमित्त पु शिरोली यांच्या वतीने महाप्रसाद वाटप

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील फैजाने फाउंडेशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अजमेर गरीब नवाज उरूसा निमित्य अहमदनगर पिर दर्ग्यामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम अहमद पीर दर्ग्यामध्ये गलेफ व पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.या महाप्रसाद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच कृष्णात करपे,किसान मोर्चा उपाध्यक्ष राजेश पाटील , ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश कौंदाडे, उद्योजक बाळासाहेब पाटील , उद्योजक सलीम महात , ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव उद्योजक योगेश खवरे , माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे बाजीराव सातपुते काँग्रेस तालुका अध्यक्ष उत्तम पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती .मान्यवरांचे व गावकऱ्यांचे स्वागत फैजाने गरीब नवाज फौंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी महात परिवार व सनदे परिवार यांनी केले या महाप्रसादाचा लाभ पुलाची शिरोली येथील पंधराशे लोकांनी घेतल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी सांगितले सालाबादप्रमाणे याही वर्षी फाउंडेशनने अजमेर गरीब नवाज हा उरूस मोठ्या उत्साहात अहमद पिर दर्गा येथे साजरा करण्यात आला .

error: Content is protected !!