कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजर सुनीता वाईकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत असिस्टंट मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आज हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी एम माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले,पत्रकार विनोद शिंगे ,महाविकास आघाडीचे गटनेचे किरण माळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुंभोज येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजर पदी किरण माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.