हातकणंगले / प्रतिनीधी
देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील संगनमताने विरोधकांचे अर्ज बाद केल्याचा आरोप कारखान्याच्या माजी अध्यक्षा सौ रजनिताई मगदूम यांनी हातकणंगले येथे आयोजीत पत्रकार परीषदेत केला .पंचगंगा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहिर झाला त्यानुसार विरोधी गटाकडून हि उमेदवारीअर्ज दाखल केले गेले मात्र सत्ताधारी गटाने प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी कुटील संगणमत करून विरोधी गटाचे अर्ज कसे अपात्र ठरतील याचेच प्रयत्न केले गेल्याचा आरोपही सौ मगदूम यांनी केला .
उमेदवार सूचक , अनुमोदक , ऊस नसने ,सभेला गैरहजरी , करारपत्र नसने , थकबाकीदार असलेबाबत , आशा अयोग्य सबबी पुढे करून मगदूम गटाचे सर्वच अर्ज बाद केले गेले , देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सोबत घटना निर्मितीमध्ये देशभक्तत रत्नाप्पा आण्णा कुंभार यांचे योगदान अमुल्य आहे , राज्यघटनेवर ज्यांची सही आहे त्याच देशभक्त रत्नाप्पांनाच्या नावाने असलेल्या साखर कारखान्यामध्ये नैसर्गिक विधीतत्वाना तिलांजली देऊन विद्यमान संचालक मंडळाने शासकीय अधिकाऱ्यांना सामील करून घेऊन आपल्या स्वार्थासाठी शेतकरी सभासद , कामगार ,यांच्या अधिकाराचे खच्चीकरण सत्ताधारी करत असून मागील तिन्ही निवडणूकांमध्ये कारखान्याच्या व शेतकरी सभासदांसाठी विद्यमान संचालकांकडे सत्ता स्थाने सुपूर्द केल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले .
आशा अन्यायकारक छाननी प्रक्रीयेचा निषेध करून विरोधी गटाच्या तिऩ उमेदवाराचे अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला असून छाननी प्रक्रीयेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी अध्यक्षा सौ . मगदूम यांनी सांगीतले .पत्रकार परीषदेस पुंडलिकराव जाधव , अशोक पाटील , रायगोंडा पाटील , अण्णासाहेब शहापुरे , रमेश चौगुले , शोभा कोळी , मिलींद कोले , सुकमार गडगे , बाब गोंडा पाटील , महादेव कुंभार , शिवाजी कांबळे , रामगोंडा पाटील , संतोष पाटील , बाळगोंडा पाटील , राजेंद्र माने , शरद कांबळे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.