पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची संचलित कै.रा.म.महाडिक हायस्कूल, नवजीवन विद्यानिकेतन,अंकुर विद्यालय या शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पटेल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील व शिरोली ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ.पद्मजा करपे यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घघाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एआयच्या या युगात आपली गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करुन पालकांनी व विद्यार्थ्यांनी या साठी सजग असले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.मधुकर पाटील यांनी केले.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव दिला जातो असे शाळेचे प्रशासन प्रमुख एस.डी.लाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता ओऊळकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदनाने केली.यावेळी विद्यार्थी कलाकारांनी विविध प्रकारची नृत्ये,लावणी,मूक नाट्य,फॅशन शो असे अभिनयाचे विविध प्रकार सादर केले.बाल चमूनी सादर केलेल्या नृत्यास व सुशील कानडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या लावणीस प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे तात्या, उपाध्यक्ष बाबासाहेब गुरव,ग्रामपंचायत सदस्या सौ कमल कौंदाडे माई,संजीवनी गुरव,ग्रामपंचायत माजी उपसरपंच कृष्णात करपे,ग्रामपंचायत सदस्या मनिषा संकपाळ, महंमद महात,महादेव सुतार,हर्षदा यादव,आरिफ सर्जेखान, प्रमोद पाटील, शंकर पाटील, विजय पोवार,जी.पी.चव्हाण, उद्योजक निवास कदम, वसंत शिंदे, ज्ञानदेव करपे, दिग्विजय कौंदाडे, सागर कौंदाडे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका प्रियांका लाड व जयश्री तिरपणे यांनी केले सूत्रसंचालन सुवर्णा पवार यांनी केले.शाळेच्या सर्व शिक्षिकांचे यावेळी कौतुक करण्यात येऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी शाळेतील शिक्षिका भाग्यश्री ओक यांनी वंदेमातरम हे राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.