हायवा डंपर खाली उडी घेऊन हमाल कामगाराची आत्महत्या

Spread the love

धावत्या आयवा डंपर खाली उडी घेऊन हमाली काम करणाऱ्या 36 वर्षीय किरण सुरेश कांबळे याने आत्महत्या केली.ही घटना आज दुपारी चार वाजता हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत घडली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या उरण भागात राहणारा 36 वर्षीय किरण सुरेश कांबळे हा हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये हमाली काम करत होता.आज दुपारी चार वाजता औद्योगिक वसाहती मधील रस्त्यावरून जाणाऱ्या MH 09 EL 8788 या हायवा डंपर खाली किरण कांबळे याने उडी घेऊन आत्महत्या केली.त्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.समर्पण संस्थेच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

error: Content is protected !!