रुकडी ग्रामपंचायत कडून थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

Spread the love

रुकडी / प्रतिनिधी

रुकडी इथं ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने घर पट्टी आणि पाणी पट्टी वसुलीची धडक मोहीम सुरु असून सरपंच राजश्री रुकडीकर आणि ग्रामसेवक अजय वाघ हे स्वतः घरोघरी फिरत थकबाकीदारांच्यावर कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहेत.रुकडी ग्रामपंचायतीची घर पट्टी आणि पाणी पट्टी थकबाकी एकूण सुमारे 2 कोटी पन्नास लाख रुपायाचा घरात असुन यातील चालु आर्थिक वर्षातीलच सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये येणे बाकी थकीत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने  थकबाकीदारांना यापूर्वीच नोटीस पाठवली आहे.पूर्व सूचना देऊनही काही ग्रामस्थांनी कर भरलेला नाही.यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे याची गांभीर्याने दखल घेत महिला सरपंच असूनही स्वतः ग्रामसेवक कर्मचाऱ्यासह  थकबाकीदारांच्या घरोघरी फिरत आहेत.यावेळी थकीत असलेल्या घरातील थेट नळ जोडणी कट करण्यात येत आहे.कर भरल्या शिवाय नळ जोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. गावातील सर्व नागरिकांनी थकीत घर पट्टी व पानी पट्टी तात्काळ जमा करुन सहकार्य करण्याचे आवाहन करत सुरळीत सुरु असलेला पाणी पुरवठा विस्कळीत न करण्याची जबाबदारी आता ग्रामस्थांची असल्याचे सांगितले.

दरम्यान या पुढील काळातही घर फाळा व पाणी पट्टी वेळेत जमा न करणाऱ्यांची गय केली जाणार नसून ग्रामपंचायतीच्या वतीने थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या मोहिमेत त्यांच्या सोबत उपसरपंच मालती इंगळे, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचयातीचे कर्मचारीही सहभागी झाले होते.

error: Content is protected !!