यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य घेवून कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी या नावाने परिचित असलेली लालपरी ओळखली जाते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गाव तेथे एसटी धावत असते.हया लालपरीचे डॉक्टर म्हणजेच यांत्रिक कर्मचारी.जे एसटी ची सर्वतोपरी काळजी घेतात. त्यामुळेच एसटी सुरक्षितपणे व सुखरूपपणे प्रवाशांना इप्सिप्तपणे पोहोच करते.म्हणून यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कुरुंदवाड आगाराचे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी काढले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक कारागीर(यांत्रिक) धोंडीराम मारूती माने यांचा ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक सौरभ जाधव,एस.टी.बँकेचे संचालक संजय घाटगे,दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे,गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले,दौलत माने,धनपाल जुगळे,संजय तावदारे,अॅड.सुरेश पाटील,आप्पासो कुरुंदवाडे,दिलीप शिरढोणे,बाबुराव माने,सचिन कोळी यांच्यासह एस.टी.महामंडळाचे अधिकारी,कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी,आप्तेष्ट,मित्रमंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!