अध्यापिका सुनिता कोळी यांचे आदर्शवत कार्य प्रशंसनीय : सौ.भारती कोळी

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

विद्या मंदिर माने नगर रेंदाळ ता.हातकणंगले येथील उपक्रमशील अध्यापिका सौ.सुनिता दिलीप कोळी यांचे आदर्शवत कार्य प्रशंनीय असल्याचे गौरवोद्गार शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांनी काढले.सुनिता दिलीप कोळी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.उपस्थित अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.मुलींचे शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण,शैक्षणिक उठाव,शिष्यवृत्ती परीक्षा,गरजू व होतकरू मुलांमुलींना मदत अशी महत्वपूर्ण कामगिरी सेवाकालात केलेली आहे.
शिरोळच्या गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, मुख्याध्यापक रमेश कोळी,धनाजी शेवाळे,दिलीप शिरढोणे, राजीव कोरे,मारुती पुजारी,विजय कोळी, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आण्णासाहेब शिरगावे, यांचेसह ग्राम पंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक,पालक,आप्तेष्ट व मित्रमंडळी यांनी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!