शिरोळचे चिदानंद कांबळे यांना सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

कोल्हापूर येथे आज मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान सोहळा

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील सेवक ग्रुपचे संस्थापक चिदानंद मुरग्याप्पा कांबळे यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने यावर्षीचा सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे . कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक सभागृहात उद्या शनिवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.वृत्तपत्र विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते चिदानंद कांबळे यांनी शिरोळ व परिसरात सामाजिक उपक्रमाबरोबरच धार्मिक व शैक्षणिक कार्य सुरू ठेवले असून शाहू – फुले – डॉ आंबेडकर यांची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे . वृत्तपत्र विक्रेता ते सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने श्री कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे प्रमुख राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

error: Content is protected !!