पोलिसांच्या सतर्कतेमुळे इचलकरंजी येथे वाहनधारकांना जीव वाचला

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी सांगली रोडवर महावितरणची तार तुटल्यामुळे तारेचा करंट रस्त्यावरच होता.याची दखल घेऊन गावभाग पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल जाधव व कराड आणि यांनी दखल घेऊन महावितरणच्या अधिकार्‍याची माहिती दिली.तोपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावून वाहनधारकांना सूचना केल्या.त्यामुळे मोठी जीवित हानी टळली ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली वाहनधारकांतून या दोन्ही पोलिसांची कौतुक होऊ लागले आहे.

इचलकरंजी सांगली रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास महावितरणची मुख्य इलेक्ट्रिक तार तुटून पडली होती. त्यामधून इलेक्ट्रिक करंट येत होता याची माहिती काही नागरिकांनी गावभाग पोलिसांना कळवली गावभाग पोलिसा घटनास्थळी दाखल होताच नाईट राऊंडचे पोलीस हवालदार जाधव व कराड या दोघांनी पोलीस व्हॅन रस्त्याच्या मध्यभागी लावून या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर पडले आहे व रस्त्यावर करंट चालू आहे अशी स्पीकर द्वारे पुकारले त्यामुळे जीवित हानी टळली पोलिसांच्या या सतर्कतेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना जीव धोक्यात घालावा लागत होता तो जीव या पोलिसांनी वाचवला त्यांच्या कार्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहेत महावितरण ची मुख्य सप्लाय करणारी वायर तुटून पडल्यामुळे भीतीची वातावरण पसरले होते पण पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन नागरिकांना सूचना केल्यामुळे वाहनधारक वेळीच सावध झाले ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन मध्यरात्रीत सप्लाय करणारी वायर काढून घेण्यात आली आहे या पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना योग्य ते बक्षीस द्यावे अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे

error: Content is protected !!