कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज हिंगणगाव रोडवरील असणाऱ्या मेघराजा मंदिराजवळ आज मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला,या अपघातात कुंभेश्वर सेवा सोसायटीचे माजी संचालक सुनील नामे यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातात योगेश चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार,सुनील नामे आणि योगेश चव्हाण हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला समोरून धडक दिली.या धडकेत सुनील नामे यांना डोक्यात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.योगेश चव्हाण यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही,मात्र घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघातस्थळी हातकणंगले पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.या अपघातामुळे कुंभोज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अपघाताची हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.