शिरोळ / प्रतिनिधी
गेली १२ दिवस शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन अंकुशचे ऊस दरासाठी,व इतर मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरु आहे.आंदोलन अंकुशच्या या आंदोलनास शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाचा सहभाग वाढत चालल्याचे पाहून आज शिरोळ तहसीलदारांनी साखर सहसंचालक यांना तात्काळ कारखानदारांची बैठक लावून तोडगा काढण्याची विनंती लेखी पत्र पाठऊन केल्याने येत्या एक – दोन दिवसात ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे असे मत आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आज सांगितले.मागील गाळपास आलेल्या ऊसाला दुसरा हाफ्ता २०० रुपये द्यावा यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपये द्यावे यासह ऊसतोडी संदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने गेली अनेक दिवस चाललेलं हे धरणे आंदोलन शिरोळ तहसीलदार यांना डोकेदुखी ठरत चालले असून गेले तीन दिवस आंदोलन अंकुशच्या दणक्याने तालुक्यातील बेकायदेशीर वाळू व माती उपसा बंद करावा लागल्याचे चित्र आहे.हे आंदोलन असेच सुरु राहणे त्यांना अडचणीचे ठरू लागल्याने कारखानदारांचा दबाव झूगारून ही बैठक लागून तोडगा निघावा म्हणून शिरोळ तहसीलदार कामाला लागल्याचे या पत्रावरून स्पष्ट होत आहे.आंदोलकांच्या मागण्या कितपत कारखानदार मान्य करतात यावरच हे आंदोलन मिटणार की पुढे चालूच राहणार हे ठरणार असले तरी 12 व्या दिवशीही आंदोलन सुरूच असून मागण्या मान्य झाल्या तरच आंदोलन मागे घेऊ अशी ताठर भूमिका आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे अब्दुल्लाटचे माजी सरपंच कलगोंडा पाटील यांनी आंदोलनास भेट दिली.आजच्या आंदोलनात कनवाडमधील विकास शेषवरे,कामिल इनामदार,म्हामुद गौस इनामदार, रहमान सनदी,कासम सनदी, रियाज इनामदार, दिपक पाटील,अविनाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.