गोसावी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची द्या,जयसिंगपूरात मोर्चाने मागणी

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खुना करणाऱ्या आरोपीवर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जयसिंगपूर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना अखिल भारतीय भटके गोसावी समाज जयसिंगपूर यांच्या वतीने देण्यात आले.
राजगुरुनगर जि.पुणे या ठिकाणी बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी भटके गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे.त्याच्या निषेधार्थ आज जयसिंगपूर येथील गोसावी समाजाच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला गोसावी गल्ली येथून सुरुवात झाली यावेळी राजगुरूनगर येथील पीडित कुटूंबाला न्याय द्या,आरोपीला फाशीची शिक्षा द्या आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.अखिल भारतीय भटके गोसावी समाज जयसिंगपूर यांच्या वतीने सदर मागणीचे निवेदन जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की गोसावी समाजामधील असून रोजी रोटीसाठी भटकंती करत असताना काही दिवसापासून राजगुरुनगर,जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास आले आहे.पीडित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय अजय दास या नराधमांनी दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केलेली आहे.सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने सदर आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधीतुन कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत मिळावी व पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा या मागणी करण्यात आली आहे.यावेळी संभाजी मोरे, बजरंग खामकर,शैलेश चौगुले, प्रकाश पवार, सागर माने,चंद्रकात चव्हाण,महेश वैधू,गुलाम शेख,रतन पडियार,तानाजी गोसावी यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटना,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!