मुंबई / प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपासाची गती वाढवण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अंजली दमानिया यांना इशारा देत सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही माहिती असेल तर ती त्यांनी पोलिस प्रशासनाला त्वरित द्यावी.दरेकर म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,आणि त्याच्या आधारे पोलिसांना तपास सुरू केला आहे.यामुळे आरोपींविरोधात लवकरात लवकर ठोस कार्यवाही होईल.प्रवीण दरेकर यांचे आरोप आहेत की अंजली दमानिया यांना जर या प्रकरणात काही महत्वाची माहिती असले,तर त्यांनी ती पोलिसांना पुरवावी.यामुळे पोलिसांची तपासणी अधिक गतीने पूर्ण होईल आणि आरोपींना न्यायालयापुढे आणले जाईल.दरेकर पुढे म्हणाले अंजली दमानिया यांना हवेत बोलण्याचे कारण नाही.आरोप असले तरी त्यांची पुरावे द्यावेत आणि त्यांना फडणवीस सरकारच्या आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.दरेकर यांची ही प्रतिक्रिया अंजली दमानिया यांच्या त्या वक्तव्यानंतर आली, ज्यात त्यांनी खून प्रकरणातील तपासातील अडचणी आणि आरोपींवर कारवाई न होण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.