कुरुंदवाड येथे संत बाळेकुंद्री महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री सेवाभावी संस्थेच्या संत बाळेकुंद्री महाराज ध्यान मंदिराच्या तिसरा वार्षिक सप्ताह सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातून संत बाळेकुंद्री महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या सोहळ्याने शहर भक्तीमय झाले महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
भैरववाडी ता शिरोळ येथे श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री हे 28 डिसेंबर रोजी वास्तव्यास होते.त्या ठिकाणी नागरिकांनी ध्यानग्रह मंदिर उभे करून तीन वर्षे पूर्ण झाली या निमित्त आयोजित वार्षिक सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.पालखी मिरवणुकीचे उद्घाटन आम.डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आप्पासाहेब दड्डीकर,संजय पंत बाळे कुंद्रीकर,माजी नगराध्यक्ष जयराम पाटील,रावसाहेब पाटील,रामचंद्र भाऊ डांगे,दादासाहेब पाटील,धनपाल आलासे,जवाहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडलेल्या या मिरवणुकीत भजन,कीर्तन,तसेच ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. भाविकांनी फुलांचा वर्षाव करून संत बाळेकुंद्री महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या उत्साहाने घेतला.
या सोहळ्यामुळे कुरुंदवाड शहर भक्तिमय झाले असून, संत बाळेकुंद्री महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित झाले.भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!