राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोक भुजवडकर सदिच्छा समारंभ २८ डिसेंबरला

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागामध्ये अध्यापक,पदवीधर अध्यापक, मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख अशा विविध पदांवर३७ वर्षांची सेवा करून दि.३१ डिसेंबर२०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त “सुवात्सल्य मंगल कार्यालय “तारदाळ -खोतवाडी रोड तारदाळ येथे शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे.खासदार धैर्यशील माने,आमदार अशोकराव माने,आमदार डॉ.राहूल आवाडे,अरुणराव इंगवले,जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे,उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर,मंत्रालयीन कार्यासन अधिकारी नम्रता सावंत,गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी,अंजना शिंदे,गटशिक्षणाधिकारी रविंद्रनाथ चौगले,राहूल खंजिरे,सुखदेव साळुंखे,शिक्षण विस्तार अधिकारी जे.टी.पाटील,सौ.भारती कोळी, सौ.नम्रता गुरसाळे,अजयकुमार बिरणगे,एन.जे.पाटील, गुलाब गंजिले यांचेसह केंद्रप्रमुख,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सदिच्छा समारंभ संपन्न होणार आहे.सदिच्छा समारंभाचे स्वागतोत्सुक भुजवडकर परिवार,तारदाळच्या सरपंच सौ.पल्लवी पोवार,खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार, कोरोचीचे सरपंच संतोष भोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,आळते केंद्रातील मुख्याध्यापक व अध्यापक वृंद संयोजन करीत आहेत.

error: Content is protected !!