हातकणंगलेत शुक्रवारी मुद्रांक विक्री बंद आंदोलन

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

सध्या पाचशे रुपयाची मुद्रांक वापराव्यास चालू झाल्यामुळे शंभर रुपयाच्या मुद्रांकाची मागणी कमी झाली असून रुपये पाचशेची मुद्रांकांची मागणी वाढलेली आहे उपघोशागार कार्यालय इचलकरंजी येथे पाचशे रुपयाचे मुद्रांकाचा पुरेसा साठा असून देखील उपकोषागार अधिकारी महावीर पाटील हे पाचशे रुपये चा मुद्रांकाचा तुटवडा आहे असे सांगत कोषागार कार्यालयाकडून शंभर रुपयाची मुद्रांकच घेणे करिता इचलकरंजी येथील मुद्रांक विक्रेत्यांच्यावर सक्ती करत आहेत त्यामुळे जनतेला शंभर रुपयाचे पाच नग याप्रमाणे खरेदी करावे लागत असल्याने जनतेतून त्यास विरोध होत आहेत पाचशे रुपयाची मुद्रांक विक्रेत्यांकडे तसेच शिल्लक राहत आहेत.
त्यामुळे उद्या शुक्रवार रोजी हातकणंगले येथील सर्व मुद्रांक विक्रेता इचलकरंजी येथील मुद्रांक विक्रेता यांच्या वरती होणाऱ्या अन्याय विरोधात उपकोषागार कार्यालय अधिकारी इचलकरंजी यांचे मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवार रोजी हातकणंगले येथे मुद्रांक विक्री बंद करत असल्याचे निवेदन आज हातकणंगले येथील दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटना यांनी हातकणंगलेचे प्रभारी दुय्यम निबंधक के जी मुल्लांनी यांना दिले.यावेळी अनिल बनकर ,गजानन घेवारी , प्रकाश बुढढे, रावसाहेब चौगुले , शब्बीर शेख , संजय बुढ्ढे , प्रकाश पांडव , राहुल घोरपडे , सिकंदर मुजावर , रोहीत घोरपडे , इखत्यार मुजावर , श्रीकांत चव्हान उपस्तीत होते

error: Content is protected !!