इचलकरंजी / प्रतिनिधी
कबनूर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनात झालेल्या वादातून गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला,तर दुसऱ्या तरुणाला गंभीर जखम झाली.या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.प्रसाद संजय डिंगणे (वय १७, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याच्यावर गुंड्या, टोम्या, शिवराज गुरुवे अन्य टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला.या हल्ल्यात प्रसादाचा जागीच मृत्यू झाला. प्रसादला वाचवण्यासाठी गेलेल्या सौरभ शहाजी पाटील (वय २२, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) हा गंभीर जखमी झाला आहे.सौरभला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कबनूर शाळेतील स्नेहसंमेलन संपल्यानंतर यातील काही युवकांच्यात वादावादी झाली होती.यावेळी प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील याला काही युवकांनी प्रसाद व सौरभ याला जबर मारहाण केली तर प्रसाद याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले.यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ हा थोडक्यात बचावला आहे सौरभ याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच प्रसाद व सौरभच्या नातेवाईक व मित्रपरिवारांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.प्रसादला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आई-वडिलांनी आक्रोश केला.इचलकरंजी शहरात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्यामुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे.हा हल्ला जर्मनी टोळीतील काही युवकांनी केला असल्याची माहिती सौरभ पाटील यांने पोलिसांना दिली आहे.तर हा खून जुन्या वादातून झाल्याची सध्या चर्चा घटनास्थळी सुरू होती.अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत. उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.