कर्मचाऱ्याची 23 लाख 19 हजार रुपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम हडप

Spread the love
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
मे.वारणा इंडस्ट्रीज लि.संभापूर ता.हातकणंगले मधील कर्मचारी याचा भविष्य निर्वाह निधीची एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमधील 23 लाख 19 हजार 449 रुपये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी,क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर येथे न भरता स्वतःचे फायद्या करीता वापरलेने हेमंत श्रीनिवासराव जेवळीकर वय वर्ष 57 व्यवसाय नोकरी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी,क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर प्रवर्तन अधिकारी/लेखा अधिकारी) रा. चौगुले गल्ली, कसबा बावड,कोल्हापूर मुळ रा.जुळे सोलापूर ता.जि.सोलापूर यांनी पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जेवळीकर यांच्या फिर्यादीवरुन व्यवस्थापकिय संचालक चित्रसेन नागनाथ गुळवे,श्रीमती सुरेखा चित्रसेन गुळवे,हरिदास चांगदेव जोधावे,श्रीमती स्वाती चित्रसेन गुळवे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्वाती महाजन यांच्या 360/2024 भा.द.वि.सं. कलम 406,409, 34 प्रमाणे पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण करत आहेत.
error: Content is protected !!