अकीवाट येथील इकबाल बैरागदार यांचा 4 महिन्याने सापडला मृतदेह

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

अकीवाट येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात ट्रॅक्टर अपघातात वाहून गेलेले इकबाल बाबासो बैरागदार वय 56 यांचा मृतदेह कर्नाटकातील इंगळी ता.चिकोडी, जि.बेळगाव येथे आज कृष्णा नदीच्या पात्रात सापडला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल,सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खुणांवरून ओळख पटली.2 ऑगस्ट रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता.अपघातात चार जण बचावले,तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आण्णासाहेब हसुरे आणि इकबाल बैरागदार वाहून गेले होते.हसुरे यांचा मृतदेह तीन दिवसांत सापडला,मात्र बैरागदार यांचा शोध लागला नव्हता.शासनाने शोधमोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत.त्यांनी चार महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धीमाध्यमांतून माहिती देणे आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले.मंगळवारी सकाळी इंगळी येथे मृतदेह सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली. बैरागदार यांच्या मृतदेहावर आज सायंकाळी अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.मृतदेह मिळाल्याने धार्मिक विधी पूर्ण करण्याचे समाधान मिळाले असले तरी या घटनेने कुटुंबीय व मित्रपरिवार दु:खमग्न झाले आहेत.
error: Content is protected !!