७५ हजार रुपयाची मागणी,“या” नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी दुशंत कोळी यांनी कागद पत्रे वरिष्ठ अधिकारी यांना देण्यासाठी ७५ हजार रुपयाची मागणी केली होती कोल्हापूर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल करून आज त्यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.कोल्हापूर लाच लुचपत विभागाची कारवाई
इचलकरंजी नगर भूमापन कार्यालयात कार्यालयातील अधिकारी दुशंत कोळी राहणार जयसिंगपूर हे कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहतात शहरातील एका मिळकत धारकाच्या प्रोपर्टी कार्डचे काम करायचे होते.यासाठी कार्यालयातील लालसिंग नामक यांने तक्रारदाराकडे तुमचे काम करायचे असेल तर तुम्ही दुशंत कोळी यांना जाऊन भेटा तुमचे काम होईल असा सल्ला दिला.तर तुमचे कागद पत्रे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवायचे असेल तर ७५ हजार रूपरे अधिकारी यांना द्यावे लागेल अशी मागणी केली. तक्रारदरांनी पुन्हा कोळी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकारी यांना ७५ हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.तक्रारदार यांनी कोल्हापूर लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची निरसन करून दुशंत कोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला.आज शहरातील नगर भूमापन कार्यालयात दुशंत कोळी याला लाचलुचपत च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.आज दुशंत कोळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांची सुद्धा चौकशी होणार आहे.या कारवाईमुळे नगर भूमापन कार्यालयात खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयामध्ये महसूल पोलीस कायदेशीर सल्लागार नगर भूमापन बांधकाम कार्यालयामध्ये लाचेची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे अश्या अधिकार्यांना शासन पगार देत नाहीत का ? शासनाच्या पगारावर यांची पोट भारत नाहीत का ? त्यामुळे सर्वसामान्य जनता असे टोकाचे पाऊल घेते हि कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक अजय चव्हाण,विकास माने,सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, सचिन पाटील, कृष्णा पाटील, कुराडे व लाचलुचपत विभागाचे पोलीस व कर्मचारी यांनी यशस्वीपणे हि कारवाई केली.

error: Content is protected !!