पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
परभणी येथे संविधान प्रतिकृती विटंबना निषेधार्थ मोर्चामध्ये हजर असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहानीमुळे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला.देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज अंबप( ता. हातकणंगले) येथे प्रचंड जनसमुदायाने निषेध फेरी काढून तीव्र निषेध व्यक्त केला.अंबप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महिला,तरुणी,युवक, तसेच वयोवृद्ध लोक एकत्र जमले .या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त महिला सरपंच सौ.दीप्ती विकासराव माने व वडगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नी.संतोष माने यांनी केले.यावेळी मा सरपंच संपतराव कांबळे यांनी मार्गदर्शन करून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.यानंतर प्रचंड संख्येने उपस्थित जनसमुदायाने निषेध फेरीला सुरुवात केली. गावातील मुख्य मार्गावरून निषेध फेरी पूर्ण करण्यात आली.हातात निषेध फलक घेऊन आणि प्रचंड मोठ्या घोषणाने परिसर दणाणून सोडला.यावेळी उपसरपंच असिफ मुल्ला,आर.पी.आय तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर,ग्रा.पं.सदस्य सरिता कांबळे,माणिक दाभाडे, अजित माने,संदीप पाटील,कृष्णात गायकवाड,संगीता जाधव,सारिका हिरवे,रेखा गायकवाड,माधुरी कांबळे, शंकर दाभाडे डॉ. दयानंद कांबळे,भगवान कांबळे, तानाजी माळकरी,नेताजी कांबळे,प्रदीप वाडेकर(सर), ऍड.प्रताप माळकरी,संभाजी थोरात,तानाजी थोरात,सिद्धार्थ ढाले,वर्धमान कांबळे(मेजर),तानाजी ढाले, सुगंध कांबळे,अतुल कांबळे,वसंत सातवेकर, संतोष जाधव,उत्तम जाधव,राजकुमार जाधव,चंद्रकांत अंबपकर, हार्दिक झोरे, मिलिंद थोरात, शिवाजी सुवासे, प्रा.संजय दाभाडे,निखिल कांबळे,ऋषिकेश कांबळे, संकेत कांबळे,ऋषिकेश माळकरी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.स्वागत व संविधान वाचन युवराज कांबळे यांनी तर आभार शंकर दाभाडे यांनी मानले.संविधान वाचनाने निषेध फेरीची सांगता करण्यात आली.