परभणी घटनेच्या निषेधार्थ गणेशवाडी गाव कडकडीत बंद

Spread the love
गणेशवाडी/ प्रतिनिधी
गणेशवाडी येथे आंबेडकरी जनतेच्या वतीने आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यत कडकडीत गाव बंद ठेवण्यात आले.यावेळी परभणी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळासह संविधानाची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांचा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले अक्षेपार्य विधान या दोन्ही घटनांचे निषेध व्यक्त करण्यात आला.येथील सर्वच आंबेडकरी चळवळ तसेच वंचित बहुजन आघाडीचेवतीने परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व संविधान प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली आहे.त्या  समाजकंटकांचा जाहीर निषेध तसेच त्यांच्या मागील शक्तीचा चौकशी करून त्या समाजककंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा यासह अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गणेशवाडी गाव बंदची हाक देण्यात आली होती.त्यानुसार आज शनिवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापले दुकाने बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप कांबळे, सरपंच प्रशांत अपिने यांचेसह आंबेडकर विचारांचे लोक एकत्रित येऊन या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त केले.तर परभणी येथील घटनेतील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आले. दरम्यान सरपंच प्रशांत अपिने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आज दिवसभर व्यापाऱ्याने कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठ,प्रमुख चौक,मुख्य मार्गावर शुकशुकाट होता.तर सदर बंद शांततेत पार पडला आहे.यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच, विद्यमान सदस्य शरद कांबळे,पोपट लोंढे, गजानन कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!