बियर-बार मध्ये गोंधळ घालू नको सांगितल्याचा रागातून एकावर खुरप्याने हल्ला

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

कुरुंदवाड येथे बियर-बार मध्ये गोंधळ घालू नको सांगितल्याचा रागातून एकावर खुरप्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गौतम रवींद्र एकाटे वय.40,रा.कुरुंदवाड असे जखमींचे नाव आहे.याप्रकरणी महेश महादेव बागलकोटे वय.35, रा.कुरुंदवाड यांच्याविरुद्ध आज कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुरुंदवाड येथील बायपास रस्त्यावरील हॉटेल सोनमार्ग बियर बार अँण्ड परमिट रूप येथे गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोंधळ घालत असताना जखमी एकाटे याने गोंधळ घालू नका असे सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला. संशयित बागलकोटे याने रागातून सोबत असलेले शेतातील खुरप्याने एकाटेवर वार करून जखमी केल्याचे दाखल फिर्यादीत म्हटले आहे.
error: Content is protected !!