उर्दू घोसरवाडचे नाट्यीकरण केंद्रात प्रथम,तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

“माझं शाळेचं पक्क झालं” ही नाटिका केली होती सादर.

दत्तवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड येथे दि.२० डिसेंबर २०२४रोजी संपन्न झालेल्या केंद्र उर्दू कुरुंदवाड अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धेत उर्दू विद्यामंदिर घोसरवाडच्या विद्यार्थ्यांनी ”माझं शाळेचं पक्क झालं” ही नाटिका अतिशय सुंदररीत्या सादर केली व शिक्षणाचे महत्त्व सर्वांसमोर मांडत प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले.तसेच जोया सलाउद्दीन जमादार हिने कथाकथन मध्ये दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांना आसिफ मुजावर,मुस्तफा सर,यासीन पटेल, नाजीया पटेल,आसिया बागवान व केंद्रप्रमुख रियाज चौगले यांनी मार्गदर्शन केले.तर शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोत्साहन लाभले.

error: Content is protected !!