हेरवाड / प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हेरवाड ता.शिरोळ येथील संत बाळू मामांच्या भाविक भक्तांसाठी सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी हेरवाड ते आदमापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी ज्या भक्तांना पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी बाळासो परीट( टायगर) व धोंडीबा कोरुचे (पंच) यांचेकडे सेवाशुल्क प्रत्येकी ३०० रुपये भरुन नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.पायी दिंडी सोहळा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -सोमवार दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वा.कन्या शाळा येथून दिंडी प्रस्थान करेल.दुपारी कारदगा येथे जेवण,बेनाडी येथे चहा तर आडी येथे रात्रीचे जेवण व मुक्काम. मंगळवार दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी आप्पाचीवाडी येथे सकाळचा चहा व नाश्ता,बाणगे विठ्ठल मंदिर येथे दुपारचे जेवण तर रात्री बाळूमामा मंदिर आदमापूर येथे जेवण व मुक्काम.बुधवार दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी देवदर्शन,चहा व नाश्ता करून परतीचा प्रवास सुरू होईल.