हेरवाडच्या चिंगुबाई माने यांचा ९१ वा वाढदिवस साजरा

Spread the love

माने परिवाराने जिवाभावाची नाती जपली : आमदार डॉ अशोकराव माने

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांच्या आत्या
श्रीमती चिंगुबाई बापू माने ( हेरवाडकर ) यांचा ९१ वा
वाढदिवस उत्साहात साजरा झाला. ” निमित वाढदिवसाचे…आणि कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचे ! ” या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ बहिण – भावांचा सत्कार… कराओके गीत मैफिल…बर्थडे केक आणि मनोगतातून व्यक्त झालेल्या आठवणीं….हरवलेले क्षण….. भाव – भावना व्यक्त होताच अनेकांना अश्रूं लपवता आले नाहीत.एकमेकाबद्दल मतभेद विसरून कौटुंबिक जिव्हाळा व नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या संदेशपर कार्यक्रमाने उपस्थित भावूक झाले.येथील माजी उपसरपंच कै श्रीपती माने स्मृती विचार मंच व माहेर परिवार शिरोळ तर्फे आयोजित कार्यक्रमात श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व आमदार डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते हेरवाड येथील श्रीमती चिंगुबाई बापू माने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. आदर्श माता फुलाबाई श्रीपती माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांनी स्वागत केले.यावेळी आमदार डॉ अशोकराव माने म्हणाले, कै श्रीपती माने व त्यांच्या कुटुंबीयांनी जिवाभावाची नाती जपली आहे. या कुटुंबातील मी एक सदस्य असल्याने हे सर्व जाणतो. स्वतः कष्ट सोसून माहेर शिरोळ आणि सासर हेरवाड या दोन्ही परिवारासह संपूर्ण आप्तेष्टांची प्रेमाने नाती जपल्याबद्दल चिंगुबाई माने व परिवाराविषयी अभिमान वाटतो.गणपतराव पाटील म्हणाले, समाजातील कौटुंबिक नात्यामध्ये जिव्हाळा कमी होत आहेत. अशा परिस्थितीत माने परिवाराने वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चांगुलपणाच्या विचारांची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला असून हा आदर्श घेण्यासारखा आहे. या कार्यक्रमातून नव्या पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी श्रीमती चिंगुबाई माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी संगीता माने, वैशाली महाजन , लता जाधव , धोंडूबाई माने , शानाबाई माने , कांचन महाजन , शकुंतला मोरे यांनी मनोगतातून कौटुंबिक आठवणी सांगून मनमोकळे केले. वैभव माने यांनी आभार मानले.वाढदिवसानिमित्त झालेल्या गीतगायन कार्यक्रमात कलाकार राजेंद्र प्रधान , उदय शिरोळकर, उदय ठोमके, दिवाण कोळी , शकुंतला मोरे , अशोक मोरे, चंद्रकांत चौगुले यांनी कराओके गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. डॉ दगडू माने यांनी सर्वांच्या आग्रहास्तव ३० वर्षानंतर सिने अभिनेते दादा कोंडके यांच्या गाण्यावर नृत्य सादर करताच उपस्थितांनी दाद दिली.या कार्यक्रमास अक्काताई जाधव (मजले ), पार्वती खांडेकर (तारदाळ ) , गंगुबाई महाजन (बोरगाव ) यांच्यासह शिवाजी माने , शंकर माने , नायकू माने , दिनकर माने , विलास माने , शानाबाई माने, भारती शिंदे, इंदूबाई माने, सुनिता माने, रोहन माने, विनायक माने , रोहित कांबळे ,संदीप माने पेंटर , राजेंद्र दाभाडे , पी वाय कुंभार, सुहास राजमाने, चंद्रकांत खांडेकर, शंकर बिरासदार सर , अनिल कोळी , राजाराम माने , श्रेयस माने , इंजिनीयर सुमीत शेट्टी , अभिजीत माने , विठ्ठल पाटील ,अविनाश टारे , डॉ प्रमोद माने , अनिल पाटील, लोकेश पुजारी ,विनोद माने ,विलास जाधव , विजय पवार , सुनील इनामदार ,डी आर पाटील , फिरोज मुजावर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!