इचलकरंजी महापालिका आक्रमक,कर थकलेल्या मिळकतधारकांची घरे सील

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिका झाल्यापासून घरफाळा वसुलीमुळे कडक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी इचलकरंजी महापालिका अस्तित्वात आली आहे.पहिल्या वर्षी 100% वसली घरफाळा व पाणीपट्टी वसली महापालिकेने केली होती.यावर्षी सुद्धा महापालिकेने तसेच उद्दिष्ट ठेवले आहेत.याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील मिळकतदाराकडून घरफाळा व पाणीपट्टी वसुली मोहीम राबवली जात आहे.दरम्यान शहरातील राजाराम कुलकर्णी यांचा घरपाळा व पाणीपट्टी असा एकूण मिळून 75 हजार रुपयेचा थकीत आहे.गेल्या दहा वर्षापासून त्यांचे घर हे बंद आहे.महानगरपालिकेने वारंवार नोटीस बजावून सुद्धा थकीत फाळा न भरल्यामुळे आज गुरूवार दिनांक 19 डिसेंबर रोजी  महापालिकेचे अधिकारी संजय शेटे व त्यांच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी कुलकर्णी यांच्या घराला सील ठोकले आहे व तसेच नोटीस ही बजावले आहे.जोपर्यंत घरपणा पाणीपट्टी भरणार नाही तोपर्यंत घराचे सील काढले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.शहरातील आज अशा चार मिळकत धारकांची घरपट्टी पाणीपट्टी थकल्यामुळे त्यांची घरे सील करण्यात आले तसेच नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत.यावेळी महापालिकेचे अधिकारी संजय शेटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी,शिपाई कारवाई करत आहेत.

error: Content is protected !!