इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील भाग्यरेखा टाकीजवळ आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून संजय मारुती कुडाळकर (वय 42) राहणार जाधव मळा पाकिजा मस्जिद कब्रस्तान जवळ लाखे मळा इचलकरंजी हे गंभीर जखमी झाले,तर संकेत हत्तीकर (वय 19) आणि आदित्य कुडाळकर (वय 20) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार,संजय कुडाळकर, संकेत हत्तीकर आणि आदित्य कुडाळकर हे तिघेही इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाग्यरेखा टॉकीज कामगार चाळ परिसरात आले असताना पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झाला या वादातून अज्ञातांनी संजय कुडाळकर यांच्यावर हत्याराने डोक्यावर हल्ला केल्या यामध्ये कुडाळकर गंभीर जखमी झाले तर अडवणूक करताना संकेत हत्तीकर व आदित्य कुडाळकर किरकोळ जखमी झाले तिघांनाही तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळाची पाहणी केली.हल्ल्यानंतर लाके नगर परिसरातील जखमींच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती.संशयित हल्लेखोरांचा शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत. मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.