विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं – पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब माने

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

कुंभोज तालुका हातकलंगले येथे हातकणंगले पोलीस स्टेशनची नूतन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल हायस्कूल कुंभोज येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असताना पोक्सो कायदा निर्भया पथक तसेच वाहतुकीचे आवश्यक असणारे नियम या विषयावर चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एक ध्येय मनामध्ये बाळगून शिक्षण घेतले तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात परिणामी या वयात विद्यार्थ्यांचा तोल गेल्यास पुन्हा त्याचा पश्चाताप करण्याची वेळ भावी आयुष्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वयात शिक्षणच घेण्याचे काम करावे परिणामी कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये असे आव्हाने केले. यावेळी मुख्याध्यापक कुरणे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विनोद शिंगे ,जहांगीर हजरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच रेंदाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदूषणामध्ये न्यू इंग्लिश कुंभोजची विद्यार्थिनी यांनी सादर केलेला वाहतूक नियमन या प्रयोगाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार हातकणंगले पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील मोहम्मद पठाण ,माजी उपसरपंच जहांगीर हजरत, माजी उपसरपंच डी.जी वायदंडे ,संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले, संदीप तोरस्कर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!