“अपघात” जयसिंगपूर येथे चारचाकी व मोटरसायकल अपघातात एक ठार

Spread the love

जयसिंगपूर बायपास महामार्गावर असणाऱ्या हॉटेल शताक्षी येथे भरदाव वेगाने आलेल्या चार चाकी गाडीने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.परसू भीमराव बनसोडे वय वर्ष 45 मूळ गाव कर्नाटक सध्या राहणार कोथळी हा जागीच ठार झाला तर सतिश वायदंडे हा गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल झाले आहेत.याबाबत घटनास्थळावर मिळाले अधिक माहिती अशी की परसू बनसोडे व सतीश वायदंडे हे मोटरसायकल वरून जात असताना जयसिंगपूर येथील बायपास रोड येथील हॉटेल शताक्षी समोर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरदाव चार चाकी वाहनाने मोटरसायकलला जोराची धारक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वर परसू बनसोडे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर सतीश वायदंडे हा गंभीर जखमी झाला आहे.मयत झालेला बनसोडे कोथळी येथे वीट भट्टी वरील कामगार असल्याचे समजते जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.महामार्गाच्या मध्यभागीच हा अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!