कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीस दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कार

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी 

कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीस दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन 2024 पुरस्कार मिळाला सहकारी पतसंस्थांसाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा बँको ब्लू रिबन पुरस्कार 2024 हा संस्थेला सलग दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून अग्रगण्य असणाऱ्या कुंभोज अर्बन पतसंस्थेस उत्कृष्ट कामकाजाबद्दल सण 2023 २०२४ सालाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे राज्यभरातील सर्व नागरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्या कामकाजाचे योग्य मूल्यमापन करून बँको राष्ट्रीय समिती मार्फत सदर पुरस्कार दिला जातो संस्थेने यावेळी नागरी सहकारी पतसंस्था ठेवी दहा ते बारा कोटीपर्यंत या विभागात आपला सहभाग नोंद केला होता सदर पुरस्काराचे वितरण जानेवारीमध्ये लोणावळा येथे समारंभ पूर्वक होणार आहे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील उपाध्यक्ष शितल कळंत्रे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे कुशल मार्गदर्शक श्री अण्णासो कळंत्रे या सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संस्थेने सभासदांचा ठेवीदारांचा विश्वास जपत प्रगती साधली आहे पारदर्शी कारभार करत संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमी संस्थेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केले मुळे सन 2024 साली संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे या यशाचे भागीदार सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक आहेत असे संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब बाळगोंडा पाटील शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!