आयुष्यमान आरोग्य मंदिर-हिंगणगाव येथे क्षयरोग मुक्त अभियान – डॉ. सत्यजित तोरसकर

Spread the love

100 दिवसीय क्षयरोग तपासणी अभियान

आयुष्यमान आरोग्य मंदिर-हिंगणगाव येथे क्षयरोग मुक्त अभियान – डॉक्टर सत्यजित तोरसकर

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

आयुष्यमान आरोग्य मंदिर,उपकेंद्र हिंगणगाव येथे 100 दिवसीय क्षयरोग मुक्त अभियान चे उद्घाटन हे हिंगणगाव च्या ग्रामपंचायत सदस्य सौं.पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाले.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सत्यजित तोरस्कर यांनी सदर क्षयरोग अभियाना चे स्वरूप सांगून केली.त्या नंतर 100 दिवस काय नियोजन करायचं,अभियान हेतू,तपासणी ठिकाण,क्षयरोग निदान व लक्षण त्या बाबत सर्व माहिती
आरोग्यसेवीका सौं.मनीषा जाधव यांनी दिली.या वेळी मा.सरपंच बबन पाटील,संभाजी पाटील,आरोग्य सेवक चंद्रकांत भंडारे सह सर्व आशाताई, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!