असा कोणता दानव आहे की ज्याला देवांपेक्षाही मोठे स्थान आहे.हा राक्षस महादेवाचा एक गण आहे ज्याचं नाव आहे.कीर्तीमुख एकदा महादेव योगनिद्रामध्ये लीन होते. तेव्हा राहूने त्यांच्या डोक्यावर असलेल्या चंद्राला ग्रहण लावले ज्याला बघून महादेव खूप जास्त क्रोधीत झाले. आणि त्यांनी जागाच्या भरात आपल्या तिसऱ्या डोळ्यातून कीर्ती मुखाची उत्पत्ती केली किर्तीमुख राहु खाण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पळू लागला. या प्रसंगाला राहू खूप जास्त घाबरला व त्यांनी महादेवाची जाऊन माफी मागितली.आता आपले महादेव भोळे भंडारी त्यांनी राहु लगेच माफ केलं. पण किर्तीमुख म्हणाला मी तर खूप भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ त्यावर महादेव म्हणाले तू स्वतःलाच खाऊन टाक आणि कीर्ती मुखाने देवाच्या आदेशाचे पालन करून स्वतःला पूर्णपणे खाऊन टाकले त्यावर महादेवाने कीर्ती मुखाला एक वरदान दिले. व म्हणाले की ज्या पण दरवाज्यावर तुझे मुकुट लावले जाईल तिथली नकारात्मक शक्ती तू पूर्णपणे खाऊन टाकशील तेव्हा पासून अशी मान्यता आहे.की ज्या पण दरवाज्याच्या बाहेर किर्तीमुखाचा मुकुट लावला जातो तिथली नकारात्मक ऊर्जा तो पूर्णपणे खाऊन टाकतो.