शेतकरी वजन काट्याचा लाभ घेऊन काटामारी रोखा – धनाजी चुडमुंगे

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

उसाच्या वजनात काटामारी केली जाते अशी शेतकऱ्यांच्या मनात बऱ्याच वर्षांपासून शंका होती काटामारी मुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने म्हणून आंदोलन अंकुशच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या वर्गणीतून शिरोळ नृसिंहवाडी रोडवर शेतकरी वजन काट्याची उभारणी करण्यात आली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या त्रयस्थ काट्याचा वापर करून आपल्या उसाच्या वजनातील होणारी काटामारी रोखावी असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.
या काट्याच्या यशस्वीते बद्दल सांगताना ते म्हणाले की गत हंगामात शेतकऱ्यांनी या वजन काट्यावर मोठया प्रमाणात आपल्या उसाची वाहने वजन करून मगच कारखाण्याला पाठवली होती त्यामुळे कारखान्यांना पण नाईलाजाने आपले वजन काटे चोख ठेवावे लागून गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकरी 5 ते 6 टनाने उत्पादन वाढल्याचे निदर्शनास आले आहे यावर्षी पण शेतकऱ्यांनी अजून मोठया प्रमाणात आमच्या काट्यावर वाहने घेऊन यावीत आणि आपल्या उसाच्या वजनाची खात्री करून मगच आपली वाहने कारखाण्याला पाठवावीत जेणेकरून काटामारी रोखण्याचा आमचा उद्देश साध्य होईल.

चौकट
एखादे उसाचे वाहन खाजगी वजन काट्यावर वजन करून कारखान्यात आले असे कारखाण्याच्या निदर्शनास आल्यास त्या वाहतूक दाराला किंवा शेतकऱ्याला त्रास दिला जायचा पण गत हंगामात 2600 वाहने आमच्या काट्यावर वजन करून गेली पण एकाही वाहतूकदाराला किंवा शेतकऱ्याला त्रास देण्याचे धाडस कोणत्याच कारखाण्याचे झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही मनात भीती न बाळगता वजनाची खात्री करून जावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी केले.

महत्वाचे
गत हंगामात या शेतकरी वजन काट्यामुळे भागातील शेतकऱ्यांचे काटामारितून होणारे नुकसान रोखले गेल्याने 70 ते 80 कोटी रुपये वाचले गेले अशा प्रकारचा हा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग केला गेला असून याची यशस्वीता पाहून आणखी तीन ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकीचे वजन काटे उभारण्याचे काम सध्या राज्यात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!