कुरुंदवाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन

Spread the love

कुरूंदवाड / प्रतिनिधी

भारताची पुण्याई होती म्हणून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्या देशात झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि संविधानावर संपूर्ण देश आधारित आहे.आपल्या पवित्र संविधानाच्या विचाराचा वारसा इतर देशातही जोपासला जात असल्याचे प्रतिपादन आंबेडकरवादी अनुप मधाळे यांनी केले.दरम्यान सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन शहरातून शांतता फेरी काढली.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शुक्रवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे,रामदास मधाळे,गौतम ढाले सुचितोष कडाळे आदींनी भाषणे केली.शहरातील विविध सामाजिक संस्था,दलित-बौद्ध संघटना,पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथील सिताबाई पटवर्धन हायस्कुल,साने गुरुजी विद्यालय,चंद्रकला बालक विद्या मंदिरातर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून अभिवादन रॅली काढली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सलामी देऊन अभिवादन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे,शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे,दयानंद मालवेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राजू आवळे,सुहास पासोबा, राजेंद्र बेले,आप्पासाहेब भोसले,ममतेश आवळे आदी उपस्थित होते.कुरूंदवाड पालिका सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी अमोल कांबळे,अजित दिपंकर,आयुब  मतवाल,अभिजित वासू कांबळे,शशिकांत कडाळे, रिझवान मतवाल,निशिकांत ढाले,संकेत कोथळे अदि उपस्थित होते.येथील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला भाई अजित देसाई,विलास साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी आनंदराव लांडगे,प्रताप ढोणे,सुरेश सासणे, विशाल साळूखे,इलाई बकरकसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!