पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलासनगर पुलाची शिरोली येथील प्रशालेत ग्रामपंचायत पुलाची शिरोली मार्फत मोफत वही वाटप समारंभ सोमवार दिनांक ४/१२/२०२४ रोजी आमच्या प्रशालेत ग्रामपंचायत पुलाची शिरोली मार्फत प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना त्यांच्या शालेय विषयानुसार 3312 वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यापैकी पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांना 1621 तर सहावी ते नववी विद्यार्थ्यांना 1691 वह्यांचे मान्यवरांच्या उपस्थित वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे व महंमद महात उपस्थित होते तसेच संस्थापक एस एन पाटील व संस्था सचिव माननीय सौ एम एस पाटील व शाळेचे मुख्याध्यापक सी पी वाकेकर व डोईफोडे मॅडम सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते श्रीकांत कांबळे यांनी आपल्या मनोगतात शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन याविषयी गौरवउद्गार काढले महंमद महात यांनी गरीब व होतकरू असणारे प्रशालेतील विद्यार्थी यांना असेच सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.संस्थापक एस एन पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून प्रशाला अशीच नेत्र दीपक कामगिरी करीत राहील अशी ग्वाही दिली संस्था सचिव सौ एम एस पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनात समाज ऋणाची व कृतज्ञतेची भावना जागृत करून आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अखेरीस प्रशालेच्या वतीने शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मान्यवरांच्या उपस्थित वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार सौ एस जी पाटील तर सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री एल ए श्रावस्ती यांनी केले.