तेरवाड येथे मार्गावरील बॅरिकेट्सला धडकून प्रवाशी रिक्षाचा अपघात

Spread the love

हेरवाड / प्रतिनिधी

हेरवाड ते पाचवा मैल मार्गावर अपघाताची मालिका

सुरू आहे गेल्या दिन दिवसात चौथा अपघात घडला आहे.आज शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास एक तीन चाकी रिक्षा मार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सला धडकून पलटी झाली आहे यामध्ये रिक्षातील प्रवाशी जखमी झाले आहे.हा अपघात तेरवाड येथे घडला आहे.या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अपघातामुळे हेरवाड ते पाचवा मैल मार्ग हे अपघाताचे केंद्र बनले आहे.दरम्यान घटनास्थळी नागरीकांनी रिक्षातील प्रवाशांना बाहेर काढले आहे.तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची रात्री 9 वाजेपर्यंत कुरुंदवाड पोलिसातून नोंद झाली नव्हती तर अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!